Google Gemini च्या ‘या’ ३ ट्रिक्समुळे शिक्षकांचा वेळ वाचणार; कामाचा ताण होईल अर्धा!

By Rohan Miraje - AI + तंत्रज्ञान लेखक

आजच्या काळात शाळा आणि कॉलेजमध्ये तंत्रज्ञानाचा वापर खूप वेगाने वाढत आहे. शिक्षकांना रोजच्या धड्यांची पूर्वतयारी करायची असो, विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका किंवा क्विझ बनवायची असो, एखादा कठीण विषय सोप्या उदाहरणांसह समजवायचा असो—आपण सगळेच कधी ना कधी गुगल जेमिनी किंवा चॅटजीपीटीची मदत घेतो.

पण बऱ्याचदा अस होत की, आपण एआयला प्रश्न विचारतो आणि एआय भलतच मोठ किंवा पुस्तकी भाषेतील कठीण उत्तर समोर आणून ठेवत. मग आपल्याला पुन्हा ते उत्तर आपल्या विद्यार्थ्यांच्या वयानुसार आणि पातळीनुसार सोप्या भाषेत बदलाव लागत. यात शिक्षकांचा खूप वेळ वाया जातो.

📢 एआय संबंधित नवीन आणि उपयोगी माहितीसाठी Ai Shikshan ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत मध्ये जोडा.

शिक्षकांची हीच डोकेदुखी कायमची संपवण्यासाठी ‘एआयला साथी फॉर एज्युकेटर्स’ (AI Saathi for Educators) या विशेष प्रशिक्षणात गुगल जेमिनीच्या (Google Gemini) अशा काही प्रगत आणि गुप्त फीचर्सचा उलगडा करण्यात आला आहे, ज्याचा स्मार्ट वापर केला तर शिक्षकांचे तासन्‌तास वाचू शकतात. चला, सोप्या भाषेत या भन्नाट ट्रिक्स समजून घेऊया.

१. ‘Gemini Gems’ : तुमचा स्वतःचा पर्सनल एआय एक्सपर्ट

दरवेळी जेमिनी ओपन करून “मी सहावीचा शिक्षक आहे, मला हा धडा सोप्या भाषेत सहावीच्या मुलांना लगेच समजेल अशा शैलीत तयार करून दे…” असा मोठा प्रॉम्ट (Prompt) लिहिण्याचा कंटाळा येतो ना? गुगलने यावर Gemini Gems हा एक जबरदस्त तोडगा काढला आहे. जेम्स म्हणजे सोप्या भाषेत सांगायच झाल तर, तुम्ही एआयला आधीच कडक नियम आणि तुमच्या शाळेचा सिलॅबस देऊन तुमचा एक ‘पर्सनल एआय एक्सपर्ट’ बनवून ठेवू शकता. स्वतःचा असा एक्सपर्ट बनवण्यासाठी कोडिंग शिकण्याची अजिबात गरज नाही.

शिक्षकांसाठी जेम्स कसे उपयोगी पडतात?

जर तुम्हाला वर्गात पाठांचे नियोजन करायचे असेल, तर तुम्ही Standards-based Lesson Planner नावाचा जेम वापरू शकता. तसेच, कठीण पाठांचे रुपांतर १० मिनिटांच्या मजेशीर खेळात किंवा क्लासरूम ॲक्टिव्हिटीत करण्यासाठी Lesson Gamifier आहे, तर मुलांच्या वेगवेगळ्या बौद्धिक पातळीनुसार एकाच धड्याचे सोपे परिच्छेद बनवण्यासाठी Differentiated Reading Assistant चा वापर करता येतो.

यामध्ये तुम्ही स्वतःच्या फाईल्स (Reference Files) जोडू शकता:

या जेम्सचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही यात तुमच्या शाळेची मार्गदर्शक तत्त्वे, बोर्डाचा अभ्यासक्रम किंवा आधीचे लेसन प्लॅन्स (Knowledge विभागातून) आधीच अपलोड करून ठेवू शकता. यामुळे जेम तुम्हाला दरवेळी सुरुवातीपासून माहिती न विचारता, अगदी तुमच्या शाळेच्या नियमांना धरूनच अचूक स्टडी मटेरिअल तयार करून देईल.

२. ‘Gemini Canvas’ : एकाच स्क्रीनवर सर्व कामे तमाम!

अनेकदा आपल्याला नोट्स एका जागी टाईप करावे लागतात, प्रश्नपत्रिका दुसऱ्याच फाईलमध्ये बनवावी लागते. या त्रासातून सुटका करण्यासाठी गुगलने Gemini Canvas हे एक डिजिटल वर्कस्पेस दिले आहे. हा शिक्षकांसाठी एक जादूई बोर्ड आहे, जिथे रायटिंग, कोडिंग आणि कंटेंट क्रिएशन एकाच जागी होते.

जेमिनी कॅनव्हासमध्ये शिक्षक एकाच स्क्रीनवर एकाच वेळी धड्याचे नियोजन, मुलांसाठी फ्लॅशकार्ड्स, छोट्या क्विझ आणि विज्ञानाचे इन्फोग्राफिक्स (Infographics) अत्यंत वेगाने डिझाईन करू शकतात. याचा सर्वात मोठा फायदा असा की, तयार केलेल्या माहितीमध्ये पुढचे बदल तुम्हाला त्याच वर्कस्पेसमध्ये करता येतात. म्हणजे एकदा उत्तर मिळाल्यानंतर ते कॉपी करून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची आणि पुन्हा सुरुवात करण्याची कटकट पूर्णपणे संपते!

३. ‘Deep Research’ : मोठ्या माहितीचा सखोल आढावा

जेव्हा शिक्षकांना एखाद्या विषयावर प्रकल्प (Project) किंवा वार्षिक अहवाल तयार करायचा असतो, तेव्हा गुगलवर प्रत्येक वेबसाईट वेगळी उघडून माहिती शोधणे खूप वेळखाऊ ठरते. इथेच गुगलचे Deep Research हे प्रगत फीचर कामी येते. हे टूल एकाच वेळी इंटरनेटवरील विविध अधिकृत वेबसाईट्सचा वेगाने शोध घेते.

आधी प्लॅन, मग रिपोर्ट:

डीप रिसर्च थेट अंतिम रिपोर्ट तयार करत नाही. ते आधी विषयासाठी एक Research Plan तयार करते. हा प्लॅन पाहून शिक्षकांना गरज वाटल्यास ते त्यात बदल करू शकतात आणि त्यानंतर मुख्य रिसर्च सुरू होतो. हा सखोल रिपोर्ट तयार होण्यासाठी साधारण ५ ते १० मिनिटे लागतात.

पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा: एआयने रिपोर्ट आणि पुराव्यांचे संदर्भ (Citations) दिले म्हणून ती माहिती डोळे झाकून १००% अचूक मानू नका. विद्यार्थ्यांना वर्गात शिकवण्यापूर्वी आकडे, तारीख किंवा वैज्ञानिक माहिती मूळ पुस्तकातून एकदा नक्की तपासून घ्या.

हेही वाचा: AI वर आंधळा विश्वास ठेवताय? शिक्षकांनो, Ai वापरताना ‘या’ ३ गंभीर चुका आत्ताच टाळा.

बोनस फीचर्स: ‘Audio Overviews’ आणि ‘Guided Learning’

Audio Overviews (धडा आता ऐकता येणार): जर शिक्षकांकडे मोठा रिसर्च रिपोर्ट किंवा डॉक्युमेंट वाचण्यासाठी वेळ नसेल, तर जेमिनी त्याचे रुपांतर पॉडकास्ट स्टाईल ऑडिओ (Podcast-style audio) मध्ये करू शकते. त्यामुळे माहिती फक्त वाचण्याऐवजी शिक्षक कामाच्या गडबडीत ऐकून मुख्य मुद्द्यांचा आढावा घेऊ शकतात.

Guided Learning (समजून शिकण्यासाठी): शिक्षणामध्ये एआयचा वापर करताना गुगलने एका महत्त्वाच्या गोष्टीवर भर दिला आहे—मुलांना कधीही आयती उत्तरे देऊ नका. जेमिनी मधील हा मोड विद्यार्थ्याला थेट उत्तर सांगत नाही. त्याऐवजी, जेमिनी विद्यार्थ्याला विचार करायला लावणारे उलट प्रश्न विचारतो आणि त्याला पायरी-पायरीने (Step-by-step guidance) स्वतःचे उत्तर स्वतः शोधण्यास मदत करतो. यामुळे मुलांची विचार करण्याची क्षमता वाढते.

शिक्षकांसाठी एक सोपे प्रॅक्टिकल उदाहरण:

समजा, तुम्हाला इयत्ता ७वी च्या वर्गात “प्रकाशाचे परावर्तन” हा विषय शिकवायचा आहे, तर तुम्ही एआयचा वापर एकाच वेळी पूर्ण ‘टीचिंग वर्कफ्लो’ (Teaching Workflow) साठी कसा करू शकता, ते पहा:

Gems: या विषयासाठी लेसन प्लॅनिंग करणारा तुमचा खास कस्टमाईज्ड असिस्टंट तयार करा, ज्याला तुमचा सिलॅबस आधीच माहित असेल.

Canvas: त्याच स्क्रीनवर प्रकाशाच्या परावर्तनाचे सुंदर इन्फोग्राफिक, विद्यार्थ्यांसाठी फ्लॅशकार्ड्स आणि एक छोटी क्विझ अवघ्या काही मिनिटांत तयार करा.

Deep Research: त्या विषयाबाबत जगभरात झालेले नवीन प्रयोग आणि वैज्ञानिक संदर्भ असलेला एक सखोल रिसर्च रिपोर्ट तयार करा.

थोडक्यात सांगायचे तर, गुगल जेमिनी चे हे प्रगत फीचर्स वापरून तुम्ही तुमचा मोठा वेळ वाचवू शकता आणि कामाचा ताण कमी करू शकता.

हेही वाचा: Rent Face To Ai: आता AI ला चेहरा भाड्याने देता येणार? सुरू झाला कमाईचा नवा मार्ग; मिळू शकतात लाखो रुपये!.

एआय शिक्षण वर अशाच प्रकारे ChatGPT, AI Tools, AI Photo Editing, Prompts आणि एआय चा रोजच्या आयुष्यातील उपयोग सोप्या मराठीत समजून घेण्यासाठी आमच WhatsApp Channel आत्ताच फॉलो करा.

TAGGED:
Share This Article
AI + तंत्रज्ञान लेखक
Follow:
रोहन मिरजे हे डिजिटल कंटेंट आणि तंत्रज्ञान विषयांवर लेखन करणारे लेखक असून त्यांना डिजिटल क्षेत्रातील १८ वर्षांचा अनुभव आहे. AI, ChatGPT, Google Gemini, AI Tools, AI Prompts आणि AI Photo Editing यांसारख्या विषयांवरील माहिती ते सोप्या आणि समजण्यासारख्या मराठीत मांडतात. AI तंत्रज्ञानाचा शिक्षण, काम आणि दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष उपयोग कसा करता येईल, हे महाराष्ट्रातील मराठी वाचकांना समजावून सांगणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.
फॉलो करा