एआयचा वापर आता फक्त फोटो बनवण्यासाठी, प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी किंवा ऑफिसच काम सोप करण्यापुरताच उरलेला नाही. ज्या तंत्रज्ञानाचा वापर जगभरात कामाची गती वाढवण्यासाठी होतोय, त्याच तंत्रज्ञानाचा वापर लोक सायबर गुन्हेगारही तितक्याच वेगाने स्वतःच्या फायद्यासाठीही करू लागले आहेत, याच एक धक्कादायक उदाहरण नुकतच समोर आल आहे.
सप्टेंबरच्या सुरुवातीला समोर आलेल्या एका सुरक्षा अहवालानुसार, एका चिनी भाषिक सायबर गुन्हेगाराने आधुनिक AI Agents च्या मदतीने अवघ्या पाच दिवसांत तब्बल १०० पर्यंत व्यावसायिक संस्था आणि कंपन्यांना लक्ष्य केल.
📢 एआय संबंधित नवीन आणि उपयोगी माहितीसाठी Ai Shikshan ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत मध्ये जोडा.
यादरम्यान हॅकरच्या सर्व्हरवर ६ लाखांहून अधिक क्रेडिट कार्ड रेकॉर्ड्स आढळल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र या सर्व कार्ड्सचा प्रत्यक्ष गैरवापर झाला किंवा त्यातून पैसे काढले गेले कि नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे, हे संपूर्ण ऑपरेशन चालवण्यासाठी त्या हॅकरला केवळ सुमारे ८,००० डॉलर्स (सुमारे साडेसहा ते सात लाख रुपये) खर्च आल्याचे तपासात समोर आले आहे.
कमी खर्च, वेग आणि मोठ्या प्रमाणावर काम ऑटोमेट करण्याची क्षमता—या गोष्टींमुळे ही घटना सायबर सुरक्षेच्या दृष्टीने विशेष लक्षवेधी ठरली आहे.
AI ने नेमक काय काम केल?
सामान्यतः अशा प्रकारच्या मोठ्या सायबर ऑपरेशन्ससाठी हॅकर्सची एक मोठी टोळी लागायची, ज्यांना वेगवेगळ्या कंपन्यांच्या सर्व्हरमधील त्रुटी शोधण्यासाठी अनेक आठवडे किंवा महिने लागायचे. पण या प्रकरणात AI Agents मुळे अनेक किचकट कामं मोठ्या प्रमाणावर ऑटोमेट करण्यात आली.
उपलब्ध माहितीनुसार, त्या हॅकरने DeepSeek, Moonshot AI चे Kimi आणि Anthropic च्या Claude सारख्या प्रगत AI मॉडेल्सचा वापर केला. उपलब्ध logs नुसार AI Agents चा वापर target systems तपासणे, संभाव्य vulnerabilities शोधणे आणि हल्ल्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मदत करणे यासाठी करण्यात आला. हॅकर स्वतः मुख्य operator म्हणून सूचना देत होता, तर AI Agents मोठ्या प्रमाणावर repetitive आणि technical कामे करत होते.
अहवालानुसार, सुमारे १०० पर्यंत संस्थांना लक्ष केले गेले होते; त्यापैकी किमान ३० वेबसाईट्स मध्ये प्रत्यक्ष शिरकाव झाल्याचे तपासात समोर आले आहे.
हेही वाचा: DIKSHA Portal वरील ‘AI Saathi for Educators’ कोर्समध्ये नेमकं काय आहे? जाणून घ्या.
सामान्य इंटरनेट वापरकर्त्यांसाठी याचा धोका काय?
या घटनेत सर्वात चिंतेची बाब म्हणजे समोर आलेले आर्थिक रेकॉर्ड्स. एवढ्या मोठ्या प्रमाणावर payment-card रेकॉर्ड्स समोर आल्यामुळे आर्थिक फसवणूक आणि ओळख चोरीसारख्या जोखमींबाबत चिंता निर्माण होते. मात्र या डेटाचा पुढे नेमका कसा वापर झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
एआयच्या मदतीने सायबर हल्ल्यांचे प्रमाण वाढू शकते, त्यामुळे असे AI-driven threats ओळखणे आणि त्यांना रोखणे cybersecurity teams समोरच नव आव्हान बनत आहे.
AI चा अशा प्रकारे अनपेक्षित किंवा अनियंत्रित वापर होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
काही दिवसांपूर्वी Google च्या Gemini AI बाबतही असाच एक प्रकार चर्चेत आला होता. एका cybersecurity evaluation दरम्यान Gemini मॉडेलला अनपेक्षित इंटरनेट ऍक्सेस मिळाल्यानंतर ते तीन वास्तविक कंपन्यांच्या सिस्टिम्स पर्यंत पोहोचले होते. एका प्रकरणात password guessing आणि इतर दोन प्रकरणांत public repositories मधून मिळालेल्या credentials चा वापर झाल्याचे समोर आले. त्यानंतर मॉडेलने हे systems test च्या बाहेरचे असल्याचे ओळखून पुढचे काम थांबवले.
शेवटी काय समजून घ्यायच?
या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते—AI Agents मुळे सायबर हल्ल्यांचा वेग आणि scale बदलू शकतो. एखाद्या हॅकरला प्रत्येक काम स्वतः करण्याऐवजी अनेक काम AI कडून automate करून घेता येत असल्याने cybersecurity teams समोरही नवीन आव्हान उभ राहत आहे.
त्यामुळे सामान्य इंटरनेट वापरकर्त्यांनी online security कडे दुर्लक्ष न करण महत्त्वाच आहे. बँक खात्यांवर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सुरू ठेवणे, अनोळखी links किंवा attachments टाळणे, card transactions वर SMS/Email alerts सुरू ठेवणे आणि संशयास्पद व्यवहार दिसताच तातडीने बँकेला कळवणे यासारख्या मूलभूत गोष्टी स्वतःच्या आर्थिक सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.



