ChatGPT वापरताना आपण आतापर्यंत एक गोष्ट सतत ऐकत आलो आहोत—चांगला Prompt लिहा आणि AI कडून चांगला रिझल्ट मिळवा. पण आता AI च्या वेगाने वाढणाऱ्या क्षमतेमुळे ही पद्धत हळूहळू पूर्णपणे बदलतेय का?
OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांनी नुकतच विद्यार्थ्यांशी संवाद साधताना AI च्या बदलत्या भविष्याबद्दल काही अत्यंत महत्त्वाचे आणि धक्कादायक मुद्दे मांडले. त्यांच्या म्हणण्यानुसार, आजची AI Systems पूर्वीपेक्षा खूप अधिक सक्षम झाली आहेत. त्यामुळे एकाच व्यक्तीला AI चा वापर करून आता पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी मिळत आहे.
📢 एआय संबंधित नवीन आणि उपयोगी माहितीसाठी Ai Shikshan ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत मध्ये जोडा.
सॅम ऑल्टमन नेमक काय म्हणाले?
विद्यार्थ्यांशी झालेल्या चर्चेत ऑल्टमन यांनी सांगितले की, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) अधिक प्रगत होत गेल्यामुळे व्यक्तीच्या कामाचा स्केल (Scale) मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
कामाचा वेग वाढला: पूर्वी एखादी मोठी कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक लोकांची टीम, बराच वेळ, Coding Knowledge आणि मोठ्या संसाधनांची (Resources) गरज असायची. आता AI मुळे त्यातील अनेक कठीण कामे अवघ्या काही मिनिटांत वेगाने पूर्ण करता येतात.
बदललेला दृष्टिकोन: म्हणजेच आता प्रश्न फक्त “AI ला काय Prompt द्यायचा?” एवढ्यापुरता मर्यादित राहिलेला नाही.
नवीन प्रश्न: त्याऐवजी खरा प्रश्न असा असायला हवा— “AI च्या मदतीने आता आपण अस काय करू शकतो, जे काही वर्षांपूर्वी इतक सहज शक्य नव्हत?”
ऑल्टमन यांनी विद्यार्थ्यांना याच दिशेने विचार करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, AI आणि Automated Coding मुळे याआधी अशक्य वाटणाऱ्या अनेक कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.
हेही वाचा: फोटो वापरून बनवा 8 खास वाढदिवस शुभेच्छा इमेजेस.
म्हणजे Prompt Engineering संपणार का?
नाही! ही बातमी वाचताना सर्वात आधी हा गैरसमज दूर करणे खूप गरजेचे आहे.
ChatGPT किंवा इतर AI Tools वापरताना ‘Prompt’ अजूनही तेवढाच महत्त्वाचा आहे. तुम्हाला एखाद्या विशिष्ट कामासाठी एआय कडून अपेक्षित आणि अचूक रिझल्ट हवा असेल, तर त्याला स्पष्ट निर्देश (Instructions) देणे खूप गरजेचे आहे.
एक सोपे उदाहरण पाहूया:
तुम्ही ChatGPT ला फक्त “एक लेख लिह” असे सांगितले, तर मिळणारा रिझल्ट खूप सामान्य असू शकतो.
पण तेच जर तुम्ही त्याला लेखाचा विषय, भाषा, वाचक कोण आहेत, लेखनाचा टोन कसा असावा, लेखाची रचना आणि आवश्यक माहिती स्पष्ट करून सांगितली, तर रिझल्ट अधिक प्रीमियम आणि दर्जेदार मिळतो.
म्हणूनच Prompting संपलेले नाही, तर बदलतोय तो केवळ AI वापरण्याचा ‘स्कोप’ (Scope)!
पूर्वी आपण AI कडून फक्त ‘एक’ काम करून घ्यायचो!
ChatGPT च्या सुरुवातीच्या काळात अनेक लोक AI ला अतिशय छोटी-छोटी कामे सांगत होते:
ईमेल लिहायचा आहे? — AI ला सांगा.
आर्टिकलचा इंट्रो हवा आहे? — AI ला सांगा.
ट्रान्सलेशन (Translation) करायच आहे? — AI ला सांगा.
एखादा कोड (Code) लिहायचा आहे? — AI ला सांगा.
म्हणजेच, सुरुवातीला AI हा एका विशिष्ट कामासाठी वापरला जाणारा केवळ एक छोटा Digital Assistant होता.
पण AI Systems जसजशा अधिक प्रगत आणि हुशार होत आहेत, तसतशी परिस्थिती पूर्णपणे बदलत आहे. आता एखादी व्यक्ती AI च्या मदतीने मूळ कल्पनेपासून (Idea) ते थेट त्याचे थेट प्रोटोटाइप (Prototype) बनवण्यापर्यंतची सर्व कामे एकाच वेळी करू शकते. Coding, Research, Content, Data Analysis अशा अनेक डिजिटल टास्कमध्ये AI आता एका सहकाऱ्यासारखी मदत करत आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीची कार्यक्षमता कमालीची वाढणार आहे.
ChatGPT तयार होण्यामागील एक रंजक गोष्ट!
या चर्चेत सॅम ऑल्टमन यांनी ChatGPT तयार होण्यामागची एक रंजक पडद्यामागची गोष्टही सांगितली.
जेव्हा GPT-3 मॉडेल उपलब्ध झाले, तेव्हा OpenAI समोर सर्वात मोठा प्रश्न होता की या टेक्नॉलॉजीचे नेमके प्रॉडक्ट काय असू शकते? सुरुवातीला अनेक डेव्हलपर्स त्याचे API वापरत होते. पण काही युझर्स त्या API चा वापर वेगळ्याच प्रकारे करत होते. ते त्याचा वापर ChatGPT सारख्या संवादात्मक संभाषणासाठी (Conversational Experience) करत होते.
OpenAI ने युझर्स या टेक्नॉलॉजीचा प्रत्यक्षात कसा वापर करत आहेत हे अत्यंत बारकाईने पाहिले आणि त्यातूनच Chatbot (ChatGPT) तयार करण्याची मुख्य दिशा मिळाली. यावरून ऑल्टमन यांनी एक महत्त्वाचा धडा सांगितला की—लोक टेक्नॉलॉजीचा प्रत्यक्षात कसा वापर करत आहेत, हे पाहणे जास्त महत्त्वाचे असते. बऱ्याचदा प्रॉडक्टची कल्पना कंपनी आधी तयार करत नाही, तर लोक स्वतः ती वापरताना नवीन मार्ग शोधून दाखवतात.
हेही वाचा: नवरात्री, गरबा आणि दांडियासाठी असे बनवा स्वतःचे सुंदर AI फोटो!.
AI आता फक्त एक टूल राहणार नाही?
ऑल्टमन यांनी AI च्या भविष्याची तुलना इलेक्ट्रिसिटी (वीज) आणि इंटरनेट यांच्या उदाहरणांशी केली.
जेव्हा जगात वीज आली, तेव्हा लोक फक्त “इलेक्ट्रिसिटी” विकत घेत नव्हते, तर त्या विजेमुळे काय काय करता येईल याला महत्त्व देत होते. उदाहरणार्थ—घरात प्रकाश मिळाला, कारखाने सुरू झाले आणि मानवाच्या काम करण्याची पद्धत कायमची बदलली.
AI बाबतही नजीकच्या काळात अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे. लोक भविष्यात “मी कोणता AI मॉडेल वापरतो?” यापेक्षा “मी AI च्या मदतीने कोणती मोठी समस्या सोडवू शकतो?” याकडे अधिक लक्ष केंद्रित करतील.
सामान्य ChatGPT युझर्सनी यातून काय शिकायचे?
हा बदल आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. समजा तुम्ही आज ChatGPT चा वापर फक्त सोशल मीडिया कॅप्शन, ई-मेल किंवा आर्टिकल लिहिण्यासाठी करत असाल, तर ते उपयुक्त आहेच. पण AI ची क्षमता लक्षात घेऊन तुम्ही आता स्वतःला एक वेगळा प्रश्न विचारला पाहिजे:
“माझ्या रोजच्या कामातील संपूर्ण प्रोसेस मी AI च्या मदतीने कशी सोपी आणि वेगवान करू शकतो?”
छोटे व्यावसायिक: कन्टेन्ट प्लॅनिंग, कस्टमर मॅसेज, प्रॉडक्ट Descriptions आणि बेसिक बिझनेस रिसर्च यामध्ये AI ची मोठी मदत घेऊ शकतात.
विद्यार्थी: केवळ प्रश्नांची उत्तरे शोधण्यापुरते मर्यादित न राहता, अभ्यासातील कठीण विषय समजून घेण्यासाठी, नोट्स तयार करण्यासाठी किंवा नवीन प्रोजेक्टवर रिसर्च करण्यासाठी AI वापरू शकतात.
Content Creator: कल्पना शोधण्यापासून ते थेट Script, Image Ideas आणि पूर्ण महिन्याचे कंटेंट प्लॅनिंग एकाच ठिकाणी करू शकतात.
एआय (AI) चा खरा क्रांतीकारी बदल इथेच आहे!
आज आपण गुगलवर किंवा युट्युबवर शोधतो: “ChatGPT ला काय Prompt द्यायचा?”
पण पुढच्या टप्प्यात कदाचित आपले प्रश्न असे असतील: “हे माझे संपूर्ण काम AI च्या मदतीने १००% कसे पूर्ण करता येईल?”
हा फरक पाहताना छोटा वाटतो, पण AI वापरण्याच्या दृष्टीने हा खूप मोठा प्रगतीशील बदल आहे. विद्यार्थ्यांसाठी ऑल्टमन यांचा हाच संदेश आहे की, “लोकांचा एखादा मोठा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करता येईल याचा विचार करा”. AI आता तुमच्यासोबत आहे, त्यामुळे याआधी कधीही शक्य न झालेल्या मोठ्या कल्पनांवर काम करा आणि नवीन गोष्टी तयार करा!
