कारला धडक अन् माज; तरुणाने Gemini AI ला बनवल ‘वकील’! पुढ जे घडल ते…

By Rohan Miraje - AI + तंत्रज्ञान लेखक
Google Gemini Ai Police Complaint Bengaluru Road Rage

रस्त्यावर गाडी चालवताना समोरचा येऊन आपल्या गाडीला धडक देऊन उलट आपल्याशीच वाद घालू लागला तर अशा वेळी आपण काय करतो?

बहुतांश वेळा खूप राग येतो, आपणही वाद घालतो, पण प्रकरण पोलिसात गेल्यावर तक्रार कशी करायची, काय सांगायच. हेच समजत नाही म्हणून अनेकदा लोक नुकसान स्वतः सहन करतात आणि विषय तिथेच सोडून देतात.

📢 एआय संबंधित नवीन आणि उपयोगी माहितीसाठी Ai Shikshan ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत मध्ये जोडा.

पण बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका स्टार्टअप फाउंडरने अशाच एका रस्ता अपघाताच्या घटनेत जे काही केल, त्याची सध्या इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू आहे.

कारला झालेल्या धडकेनंतर या पठ्ठ्याने कोणतीही गडबड केली नाही. त्याने थेट मोबाईल काढला, Google Gemini AI ला संपूर्ण घटना सांगितली आणि पोलिसांत देण्यासाठी तक्रार लिहून घेतली. पुढे काय घडल? बाईकस्वाराला का माफी मागावी लागली? हा किस्सा सध्या चर्चेत आहे.

रस्त्यावर नेमक काय घडल होत?

‘भारतॲग्री’ (BharatAgri) या प्रसिद्ध कृषी स्टार्टअपचे संस्थापक आणि सीईओ सिद्धार्थ डियालानी यांच्यासोबत हा प्रसंग घडला. बंगळुरूतील कोरामंगला भागातून ते आपल्या कारने जात होते.

एका सिग्नलजवळ अचानक एका बाईकस्वाराला वाटल की सिद्धार्थ यांची कार त्याच्या बाईकला घासली आहे. यावरून तो प्रचंड संतापला. सिद्धार्थ यांच्या सांगण्यानुसार, त्या बाईकस्वाराने थेट कारच्या आडवी बाईक लावली, गाडीच्या दरवाजावर जोरात लाथ मारली आणि स्वतःच्या बाईकने कारला जाणूनबुजून धडक दिली.

कारवर मोठा डेंट पडला होता. सुरुवातीला सिद्धार्थ यांनी हा वाद टाळण्याचा विचार केला. मात्र, कारचं नुकसान झाल्याने त्यांनी पुढे पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला.

…आणि इथे झाली AI ची एन्ट्री!

पोलिसांत जायच तर ठरल, पण खरी अडचण पुढे होती. पोलिसांना घटनेची माहिती नेमकी कशी द्यायची? अर्जात कोणते मुद्दे मांडायचे? तक्रारीची भाषा कशी असावी?

अशा वेळी सिद्धार्थ यांनी थेट Google Gemini उघडले. त्यांनी रस्त्यावर जे काही घडल, ते अगदी जसेच्या तसे जेमिनीला टाईप करून सांगितल.

जेमिनीने पोलिस तक्रारीचा मसुदा तयार करून दिला. एवढच नाही, तर तक्रार दिल्यानंतर त्याची लेखी पावती किंवा acknowledgement घेण्याचा सल्लाही दिला. त्यामुळे पोलिसांसमोर आपली बाजू मांडण सिद्धार्थ यांच्यासाठी सोप झाल.

हेही वाचा: Google Gemini AI ने चक्क ३ कंपन्यांची सिस्टीम हॅक केली? नेमक काय घडल आणि AI स्वतःहून का थांबल?.

डॅशकॅम आणि बाईकस्वाराची माफी!

फक्त तक्रार असून चालत नाही, पुरावाही लागतो. सुदैवाने सिद्धार्थ यांच्या कारमध्ये डॅशकॅम (Dashcam) बसवलेला होता. त्या कॅमेऱ्यात झालेल्या प्रकाराच रेकॉर्डिंग आणि बाईकचा नंबर स्पष्टपणे दिसत होता.

सिद्धार्थ यांनी जेमिनीने लिहून दिलेली तक्रार आणि डॅशकॅमचे फुटेज पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्या गाडीच्या नंबरच्या मदतीने बाईकस्वाराचा शोध घेतला आणि त्याला पोलीस ठाण्यात बोलावल.

सुरुवातीला तो बाईकस्वार पोलिसांसमोर स्वतःची वेगळीच बाजू मांडत होता. पण जसा पोलिसांनी त्याच्यासमोर कारच्या डॅशकॅमचा व्हिडिओ प्ले केला, तशी त्याची सगळी हवाच निघून गेली!

डॅशकॅममधील व्हिडिओ समोर आल्यानंतर पुढे बाईकस्वाराने लेखी माफी मागितली आणि कारच्या नुकसानाची भरपाई दिल्याच सिद्धार्थ यांनी सांगितल.

या संपूर्ण प्रकारानंतर सिद्धार्थ यांनी सोशल मीडियावर मिश्किलपणे पोस्ट केली—“Gemini is my lawyer now!” (म्हणजेच आता जेमिनी माझा वकील झाला आहे!)

या घटनेतून आपण काय शिकायच?

या घटनेत जेमिनीने कोर्टात जाऊन केस लढवली नाही, पण एका सामान्य नागरिकाचे सुरुवातीचे काम नक्कीच हलके केले.

पूर्वी एखादी तक्रार किंवा अर्ज नेमक्या शब्दांत लिहायचा असेल, तर अनेकांना कुणाची तरी मदत घ्यावी लागायची. आता अस काम AI च्या मदतीन करता येत.

मग तुम्हीही AIचा असा वापर करू शकता का?

नक्कीच. समजा तुमच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड झाला, एखाद्या कंपनीने खराब वस्तू देऊन पैसे परत करण्यास नकार दिला किंवा काही कायदेशीर अडचण आली—तर तुम्ही ChatGPT किंवा Gemini ला साध्या शब्दांत परिस्थिती सांगून एक स्पष्ट तक्रार मसुदा लिहून घेऊ शकता.

फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा:

AI ने तक्रारीचा मसुदा तयार केला म्हणून तो कायदेशीर सल्ला मानता येत नाही. मोठ कायदेशीर प्रकरण असल्यास पात्र कायदेतज्ज्ञांकडून सल्ला घेण आवश्यक आहे!

TAGGED:
Share This Article
AI + तंत्रज्ञान लेखक
Follow:
रोहन मिरजे हे डिजिटल कंटेंट आणि तंत्रज्ञान विषयांवर लेखन करणारे लेखक असून त्यांना डिजिटल क्षेत्रातील १८ वर्षांचा अनुभव आहे. AI, ChatGPT, Google Gemini, AI Tools, AI Prompts आणि AI Photo Editing यांसारख्या विषयांवरील माहिती ते सोप्या आणि समजण्यासारख्या मराठीत मांडतात. AI तंत्रज्ञानाचा शिक्षण, काम आणि दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष उपयोग कसा करता येईल, हे महाराष्ट्रातील मराठी वाचकांना समजावून सांगणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे.
फॉलो करा