शाळेत रोज तास घेण, मुलांच्या वह्या तपासण, त्यात दर आठवड्याला Lesson Plans बनवण आणि परीक्षा जवळ आली की प्रश्नपत्रिका बनवण या सगळ्या व्यापात शिक्षकांचा रोजचा किती वेळ जातो, हे वेगळ सांगायला नको. अनेकदा वेळ वाचवण्यासाठी शिक्षक ChatGPT किंवा इतर AI tools कडे वळतात. मात्र सामान्य AI chatbot कडून मिळालेल्या उत्तरांमध्ये आपल्या विशिष्ट पाठ्यपुस्तकाचा किंवा अभ्यासक्रमाचा संदर्भ प्रत्येक वेळी तसा असेलच असे नाही.
पण विचार करा, जर असा एखादा हुशार डिजिटल सोबती मिळाला, ज्याच्यासमोर तुम्ही फक्त तुमच्या शाळेच मराठी पुस्तक किंवा एखादी PDF ठेवली आणि त्याला सांगितलं की, “मला या पुस्तकाच्या बाहेरचा एकही शब्द नको; फक्त या धड्यावर आधारित मुलांसाठी नियोजन करून दे!”—तर शिक्षकांच किती मोठ ओझ हलक होईल?
📢 एआय संबंधित नवीन आणि उपयोगी माहितीसाठी Ai Shikshan ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत मध्ये जोडा.
Google NotebookLM मध्ये शिक्षकांसाठी अशाच प्रकारे स्वतःच्या अभ्याससामग्रीवर काम करण्याच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
तुमच्या दिलेल्या पुस्तकावरच आधारित उत्तर!
सामान्य AI chatbot मध्ये विचारलेल्या प्रश्नाच्या स्वरूपानुसार विविध ज्ञानस्रोतांवर आधारित उत्तर मिळू शकत. पण NotebookLM मध्ये तुम्ही स्वतः दिलेल्या sources वर काम करण्याची पद्धत अधिक केंद्रस्थानी आहे.
NotebookLM मध्ये तुम्ही PDF, Google Docs, Slides, Web URLs, Audio, Video अशा sources जोडू शकता. त्यानंतर त्या sources वर आधारित प्रश्न विचारता येतात आणि citations पाहता येतात. हा AI मुख्यत्वे तुम्ही दिलेल्या त्या अभ्याससाहित्याच्या आधारावरच काम करतो. त्यामुळे शिक्षकाने दिलेल्या अभ्याससामग्रीच्या आधारावर अधिक संदर्भित उत्तर मिळवण सोप होत. मात्र तयार झालेली सामग्री वापरण्यापूर्वी शिक्षकाने ती एकदा स्वतः तपासण महत्त्वाच आहे.
हेही वाचा: प्रभावी प्रॉम्प्टच्या आदर्श सूत्रात किती घटक आहेत? AI कडून चांगले उत्तर मिळवण्यासाठी हे ६ घटक!.
पाठाचे नियोजन आणि सराव
याचा सर्वात मोठा फायदा शाळेच्या रोजच्या नियोजनात होतो. उदाहरणार्थ, विज्ञानाचा किंवा इतिहासाचा एखादा मोठा धडा अपलोड करून तुम्ही विचारू शकता की, “हा धडा मला पुढच्या दोन आठवड्यांत कसा शिकवता येईल? प्रत्येक तासाची सोपी उद्दिष्टे काय असावीत?” हे टूल त्या धड्याची एक सुटसुटीत रूपरेषा आणि Lesson Sequencing तयार करण्यात मदत करू शकत.
विशेष म्हणजे वर्गात प्रत्येक मुलाची आकलनशक्ती सारखी नसते. काही मुले हुशार असतात, तर काहींना विषय समजायला थोडा वेळ लागतो. NotebookLM कडून Differentiated Learning अंतर्गत तुम्ही एकाच धड्यावर हुशार मुलांसाठी विचार करायला लावणारे प्रश्न, आणि अधिक मदतीची गरज असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मूलभूत उदाहरण एकाच वेळी तयार करून घेऊ शकता.
घटक चाचणीसाठी open-ended questions, quiz questions आणि assessment material तयार करण्यासाठीही NotebookLM ची मदत घेता येते. तुम्ही जर विज्ञानाचे शिक्षक असाल, तर प्रयोगासाठी लागणारे साहित्य आणि प्रक्रियेचा Lab Guide तयार करण्यासही हे टूल उपयुक्त ठरते.
ऑडिओ, व्हिडिओ आणि व्हिज्युअल टूल्स
या सगळ्यात सर्वात कामाच फिचर म्हणजे Audio Overview. तुम्ही दिलेल्या sources वरून NotebookLM दोन AI hosts च्या podcast-style संवादातून Audio Overview तयार करू शकत. Customize पर्यायाचा वापर करून त्याचा टोन आणि कोणत्या audience साठी overview हवा आहे हे ठरवता येत. शाळेत जाताना किंवा मोकळ्या वेळेत शिक्षक स्वतः त्या धड्याचा असा ऑडिओ आढावा ऐकून तासाची पूर्वतयारी करू शकतात.
याशिवाय माहितीचा visual explainer तयार करण्यासाठी Video Overview चा वापर करता येतो, तर संपूर्ण धड्यातील संकल्पनांचे परस्पर संबंध एका नजरेत समजून घेण्यासाठी Mind Map चा पर्याय उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या रिव्हिजनसाठी Study Guide, Flashcards आणि Glossary तयार करता येतात.
नियोजन आणि शेअरिंग
विद्यार्थ्यांना अवघड संकल्पना पायरी-पायरीने समजवण्यासाठी (Scaffolding) आणि शिक्षकांच्या बैठका किंवा Administrative Tasks च्या नियोजनासाठीही याचा वापर करता येतो. एखाद्या विषयासाठी आवश्यक सर्व संदर्भ एकत्र करून ‘Master Notebook’ तयार करता येते आणि गरजेनुसार Notebook share करून सहकाऱ्यांशी किंवा विद्यार्थ्यांशी ही सामग्री शेअर करता येते.
हे टूल वापरणही अगदी सोप आहे. Google Gemini app मध्ये ‘New notebook’ हा पर्याय निवडून नवीन Notebook तयार करता येते. त्यात आपल्या धड्याची PDF, Google Docs, Slides, Web URL किंवा इतर sources जोडायचे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारायचे. याशिवाय Gemini Notebook स्वतंत्रपणेही वापरता येते. Gemini app आणि Gemini Notebook मधील notebooks sync होत असल्यामुळे एका ठिकाणी जोडलेले sources दुसऱ्या ठिकाणीही वापरता येतात.
हेही वाचा: कारला धडक अन् माज; तरुणाने Gemini AI ला बनवल ‘वकील’! पुढ जे घडल ते….
शिक्षकांचा एक विश्वासू सोबती
शेवटी एक गोष्ट नक्की, हे तंत्रज्ञान शिक्षकांना बाजूला करण्यासाठी किंवा त्यांची जागा घेण्यासाठी आलेल नाही. फळ्याकड बघून फळ्यावर काहीतरी लिहीत असताना मागे कुजबुजणाऱ्या विद्यार्थ्याला खडू फेकून मारणारे आणि मुलांच्या डोळ्यात बघून शिकवणारे शिक्षकच खरे शिल्पकार असतात.



