कॅमेऱ्यासमोर न जाता जाहिरातींमध्ये काम करणे शक्य आहे का? हो - AI मुळे आता लोक शूटिंगशिवाय थेट 'डिजिटल ॲक्टर' बनत आहेत.
वापरकर्ते स्वतःचे फोटो अधिकृत प्लॅटफॉर्मवर अपलोड करतात. कंपन्या गरजेनुसार चेहरा निवडून त्याला AI द्वारे त्यांच्या जाहिरातीत किंवा गेममध्ये वापरतात.
एका सामान्य कर्मचाऱ्याने ३ दिवसांत ₹३५,००० कमावले, तर काही प्लॅटफॉर्मवर एका चेहऱ्याची रॉयल्टी थेट ₹१४ लाखांपर्यंत पोहोचली आहे.
वापरकर्ता स्वतः ठरवतो की चेहरा कुठे दिसेल. शैक्षणिक व्हिडिओ की गेमिंग? तसेच वादग्रस्त जाहिरातींवर बंदी घालण्याचा पूर्ण अधिकार तुमच्याकडेच राहतो.
कमाई आकर्षक असली तरी डीपफेक, ओळखीचा गैरवापर आणि डिजिटल डेटा सुरक्षिततेचे मोठे प्रश्न या नव्या तंत्रज्ञानासमोर उभे आहेत.
सध्या हा ट्रेंड चीनमध्ये गाजत आहे. भारतात डिजिटल राईट्स आणि कडक कायदे लागू झाल्यानंतर अशा संधी उपलब्ध होऊ शकतात.
व्हिडिओमध्ये चेहरा वापरणे आणि संपूर्ण AI मॉडेलला डेटा ट्रेनिंग देणे यात फरक आहे. तुमची स्वतंत्र संमती असल्याशिवाय कंपन्या डेटा वापरू शकत नाहीत.
AI फेस लायसन्सिंगचे कायदेशीर नियम आणि संभाव्य धोके जाणून घेण्यासाठी सविस्तर लेख खाली वाचा.
Rent Face To Ai: आता AI ला चेहरा भाड्याने देता येणार? सुरू झाला कमाईचा नवा मार्ग