सध्याच्या एआय टूल्सना मराठी व्याकरण समजते, पण स्थानिक उच्चार, म्हणी आणि आपल्या बोलीभाषेचा खरा लहेजा समजण्यात ते नेहमीच अडखळतात.
महाराष्ट्राची नवी एआय पॉलिसी केवळ पुस्तकी शब्दांवर थांबणार नाही. बोलीभाषा आणि आदिवासी संभाषणांचे स्वतंत्र डेटाबेस तयार करून सिस्टीमला शिकवले जाईल.
शेतात किडीचा प्रादुर्भाव असो की पिकांची काळजी; गावच्या मातीतल्या भाषेत विचारलेला प्रश्न एआय लगेच समजून स्थानिक भाषेतच अचूक सल्ला देईल.
अवघड वैज्ञानिक संज्ञा आता पुस्तकी मराठीऐवजी रोजच्या परिचयाच्या सोप्या उदाहरणांसह समजावणे एआय टूल्सना शक्य होणार आहे.
अवघड भाषेतील प्रशासकीय परिपत्रके, सरकारी योजनांची माहिती सोप्या भाषेत मिळणार.
दीड लाखांवर रोजगार, २,००० GPU ची ताकद आणि 'MahaChatur AI' चॅटबॉटद्वारे तरुणांना थेट करिअर व अप्रेंटिसशिप मार्गदर्शन देण्याची तयारी सुरू आहे.
महाराष्ट्राच्या या नवीन AI धोरणाचा सर्वसामान्यांच्या जीवनावर काय परिणाम होईल वाचा.👇
Ai आपली वऱ्हाडी किंवा मालवणी बोलणार? महाराष्ट्राच्या नव्या AI प्लॅनमुळे गेम कसा बदलणार, पाहा!