काल्पनिक सिस्टीमची सायबर सुरक्षा तपासताना Google Gemini AI कडून थेट तीन खऱ्याखुऱ्या कंपन्यांच्या सिस्टीममध्ये अनपेक्षित प्रवेश झाला.

चाचणी दरम्यान Google Gemini ला अनपेक्षितपणे इंटरनेट ऍक्सेस मिळाला आणि काल्पनिक नावाशी जुळणाऱ्या खऱ्या सर्व्हरचा शोध लागला.

एका कंपनीसाठी AI ने अचूक पासवर्डचा अंदाज लावला, तर इतर दोन प्रकरणांत इंटरनेटवरील पब्लिक रिपॉझिटरीमधील क्रेडेन्शियल्स वापरला.

सिस्टीममध्ये प्रवेश केल्यानंतर या प्रत्यक्ष कंपन्या आहेत हे समजताच Gemini ने कोणतेही नुकसान न करता पुढील काम स्वतःहून थांबवले.

AI Chatbot फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो; पण 'AI Agent' दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी स्वतःहून पुढची पावले उचलतो आणि मार्ग ठरवतो.

मे महिन्यातील या घटनेनंतर संबंधित कंपन्यांना सूचना देण्यात आली. कोणतीही डेटा चोरी अथवा नुकसान झाले नसल्याचे Google ने स्पष्ट केले आहे.

AI ला काय काम सांगायचे आहे यापेक्षा, त्याला नक्की कुठवर जाण्याची परवानगी द्यायची, हा प्रश्न आता समोर आला आहे.

या ऐतिहासिक सायबर सिक्युरिटी चाचणीचे सविस्तर तांत्रिक विश्लेषण आणि पडद्यामागील घडामोडी वाचा.