AI चुकतय की आपली पद्धत?कधी वाटलय का की AI अर्धवट उत्तर का देत? चूक AI ची नसते, तर आपण त्याला नेमकी सूचना कशी देतो यावर सगळ अवलंबून असत.
१. आधी त्याला एक 'ओळख' द्या (Role)AI ला आधी त्याची भूमिका सांगा—तो शिक्षक आहे, डॉक्टर की लेखक? ओळख ठरली की त्याचा विचार करण्याचा अँगल बदलतो.
२. परिस्थिती समजावून सांगा (Context)माहिती कोणासाठी हवी आहे? लहान मुलांसाठी की ऑफिसच्या बॉससाठी? मागचा-पुढचा संदर्भ दिल्याशिवाय AI अचूक उत्तर देऊ शकत नाही.
३. थेट मुद्द्यावर या (Task)गोलगोल बोलण्याऐवजी त्याला नेमक काय काम करून हवय ते थेट सांगा; उदा. धडा समजावणे, ईमेल लिहिणे की गणित सोडवणे!
४. लक्ष्मणरेषा आखून द्या (Constraints)उत्तर २०० शब्दांच्या आत हवय? अवघड इंग्रजी शब्द नकोत? काय करायच नाही, हे आधीच सांगितल तर वेळ वाचतो.
५. उत्तराची मांडणी कशी हवी? (Format)मोठा परिच्छेद वाचायला कंटाळा येतो? मग त्याला बुलेट पॉईंट्स, छोटी यादी किंवा टेबल स्वरूपात उत्तर मागा.
६. भाषेची शैली ठरवा (Tone)उत्तर मित्रासोबत गप्पा मारल्यासारख हवय की ऑफिससारख शिस्तबद्ध? भाषेचा टोन आधीच ठरवला, की उत्तरातील कोरडेपणा पूर्णपणे नाहीसा होतो.
एक परफेक्ट उदाहरण पाहा!या ६ नियमांचा वापर करून तयार केलेला एक परफेक्ट प्रॉम्प्ट वाचा. 👇